अकोला
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी व दिव्यांग बेरोजगार संघटना जिल्हा शाखा अकोला चे वतीने दिनांक ३डीसेंबर २०२४ ला संघटनेचे कार्यालय हेड पोस्ट ऑफीस जवळ अकोला च्या प्रांगगणात भव्य जागतीक दिव्यांग दिन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते . सदर दिनाचे औचित्य साधून दिनांक २ डिसेंबर ला सकाळ सत्रात दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ बाबत मार्गदर्शन कार्यशाळा संघटनेचे सचिव मो अ . अजीज यांचे अध्यक्षते खाली घेण्यात आली यामध्ये जिल्हा विधी व सेवा प्राधीकरण अकोला चे सचिव न्या . योगेश पैठणकर , जिल्हाध्यक्ष संजय बरडे , कोषाध्यक्ष दिलीप सरदार यांनी मार्गदर्शन केले तर दुपार सत्रात दिव्यांग शिक्षक संघटना अकोला जिल्हाध्यक्ष दिलीप सरदार यांचे अध्यक्षते खाली नवोदीत दिव्यांग साहित्यीकांचे बहारदार कवी संमेलना चे आयोजन केले होते . या मध्ये अनेक नवोदीत दिव्यांग साहीत्यीकांनी बहारदार रचना सादर केल्या कवी संमेलनाचे उत्कृष्ट संचलन संजय बरडे यांनी तर आभार रामेश्वर कवळे यांनी मानले .
दिनांक ३ डिसेंबर ला शहरातून दिव्यांगांची भव्य रॅली काढण्यात आली रैलीचा शुभारंभ अकोला जिल्हाधिकारी मा . अजीत कुंभार साहेब यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला तर समारोप मुख्य कार्यक्रम स्थळी करण्यात आला .
मुख्य कार्यक्रमाचे अध्यक्ष संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय बरडे तर प्रमुख अतिथी अकोला पश्चिम विधान सभा मतदार संघाचे नवनिर्वाचीत आमदार मा साजीद खान पठाण साहेब होते तर विशेष उपस्थिती मा. हरीनारायण परीहार समाजकल्याण अधिकारी अकोला , सौ . प्रतिभाताई अवचार माजी सभापती जि प अकोला , सचिन शेजव समाज सेवक , बाळकृष्ण नेरकर समाज सेवक तसेच संघटनेचे संस्थापक सदस्य मा दिनकरराव काळे बुलढाणा हे होते. कार्यक्रमात सेवानिवृत दिव्यांग कर्मचारी यांचा जिवन गौरव पुरस्कार देवून सापत्नीक हृदय सत्कार तसेच दिव्यांग गुणवंत कर्मचारी , गुणवंत दिव्यांग पाल्य , आदर्श शिक्षक , गुणवंत राज्य स्तरीय खेळाडू आदींचा गुणगौरव करण्यात आला कार्यक्रमांत विवाहोत्सुक दिव्यांगाचा वधूवर परिचय मेळावा ,सहभोजन व विविध उपक्रम घेण्यात आले प्रास्ताविक दिलीप सरदार यांनी तर अध्यक्षीय भाषण संजय बरडे यांनी केले सूत्रसंचालन श्रीमती दिपाली रोठे व श्याम राऊत यांनी तसेच आभार सचिव मो अ अजीज यांनी मानले
कार्यक्रमा करीता विविध समित्यांचे प्रमुख रविंद्र देशमुख , गणेश अत्तरकर , सुनिल वानखडे , रामेश्वर कवळे , प्रवीण फुले , मुस्ताक पटेल , जावेद इक्बाल , रविंद्र सिरसाठ, अविनाश वडतकर, सुनिल कवळे,अनुप तायडे, किशोर तायडे, विकार परवेज, कु.माधूरी देठे, उज्वला शर्मा,शबाना पटेल,मिरा कराड, अनुराधा शेंडे, शिल्पा वाघमारे, संगिता महल्ले, अर्चना अढाऊ,अतियाबी,सुदेष्णा पजई, दिव्यांग बेरोजगार संघटना विभागीय अध्यक्ष सुधिर कडू , जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख , अनिल सरदार ,अमोल राठोड , बंटी सावळे ,ओमप्रकाश बरेठी, राजेश रौंदळे , मनोज जयस्वाल , आदींनी चोख काम पाहिले
या जागतिक दिव्यांग दिनास जिल्हा भरातून शेकडो दिव्यांग कर्मचारी , बेरोजगार उपस्थित होते.
