अकोला: अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अकोलाचे जिल्हाध्यक्ष करामत शाह व महीला जिल्हाध्यक्ष सौ.वैशाली सपकाळ यांना अपंग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल व अपंगांना वेळोवेळी मदतीला धावून येणाऱ्या असे श्री महाविर निवासी अपंग छात्रावास शिक्षा प्रशिक्षण एवं पुनर्वसन केंद्र भानखेडा बु.जिल्हा अमरावतीच्या वतीने दिव्यांगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आहे.तसेच दिव्यांगरत्न प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष शेख अनिस पत्रकार व सुधाकर काळे संस्थापक अध्यक्ष अपंग निवासी शाळा अमरावती यांच्या हस्ते देण्यात आले.त्यावेळी राजिक शाह राज्य महासचिव ,मयुर मेश्राम जिल्हाध्यक्ष अमरावती ,राहुल वानखडे, विभागिय सचिव,रुस्तम शेख,अनवर शाह,इलियाज शेख,कांचन कुकडे,राजेश पटोकार,शेख जहुर,अपंग नेत्या सरोज पुनसे,व सर्व अपंग जनता दल सामाजिक संघटनाचे कार्यकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
