दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण पोलीस स्थापना सप्ताह 2 जानेवारी ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. त्या निमित्ताने प्रथम दिनांक 02 जानेवारी 2025 रोजी पोलीस स्टेशन हिवरखेड येथे सकाळी 11.00 ते 3.00 या वेळेत रक्तदान शिबिराचा कार्यक्रम ठेवला आहे. सदरहू संपूर्ण सप्ताहात पोलिस स्टेशन तर्फे दररोज विविध उपक्रक्रम राबविण्यात येणार आहेत .तरी दिनांक 2 जानेवारी रोजी आयोजित रक्तदान शिबिरात हिवरखेड परिसरातील अडगाव, खंडाळा , सौंदळा, हिंगणी , तळेगाव तसेच इतर गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदवून रक्तदान सर्व श्रेष्ठ दानात आपले योगदान द्यावे असे आवाहन गजानन राठोड ठाणेदार पोस्टे हिवरखेड यांनी केले आहे.
