प्रतिनिधी –
हिवरखेड येथील सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तेल्हारा तालुका विज्ञान प्रदर्शनीच्या पार्श्वभूमीवर शालेय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनीच्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे तर उद्घाटक हिवरखेड नगरपरिषदेचे मुख्य अधीक्षक निषाद वानखडे हे होते. या समारंभाच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस पाटील प्रकाश गावंडे, नगर अभियंता अभिषेक मस्के, लेखापाल समाधान तायडे, प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश इंगळे, संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे, प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे, सहपर्यवेक्षक निलेश गिऱ्हे हे होते. नगरपरिषदेचे मुख्य अधीक्षक निषाद वानखडे यांनी आपल्या उद्घाटनीय मनोगतात या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचे प्रतिपादन केले. तसेच अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून विदयार्थ्यांचे मनोबल वाढवून स्पर्धेच्या युगात टिकवून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करिता विद्यार्थ्यांना शुभेच्छा व्यक्त केल्यात. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांच्यासह अकोला वाशीम जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यापार अधिकारी सुदर्शन गाडगे, सेवा सहकारी सोसायटीचे सचिव गोपाल गावंडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांनी प्रदर्शनीसाठी तयार केलेल्या प्रतिकृतीची पाहणी केली. या प्रदर्शनीत परीक्षक म्हणून विज्ञान शिक्षिका पद्मा टाले, स्नेहा शुक्ला, अमोल येउल यांनी काम पाहिले. या प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी शिक्षक अभिजित भोपळे, मयूर लहाने, प्रशांत भोपळे,स्वप्नील गिऱ्हे, सुनील वाकोडे, निलेश कासोटे, प्रतिभा इंगळे, दुर्गा बोपले, जगदीश पवार,शारदा घायल, शंकर दुनघव, चेतन चुने, श्रीकांत परनाटे,गणेश भोपळे, कर्मचारी अंबादास चाफे, निलेश दांडगे, अक्षय मोरखडे, पूजा धूरदेव, आदींनी अथक परिश्रम घेतले. या समारंभाचे संचलन नेहा बाजारे व रेणुका राऊत यानी तर आभारप्रदर्शन प्रदर्शनीचे मुख्य संयोजक विज्ञान शिक्षक रंजित राठोड यांनी केले.
