संत शिरोमणी तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळ अकोला जिल्हाच्यावतीने सातत्याने राबवित असलेला विनामुल्य दिनदर्शिकेचे प्रकाशनाचा स्तुत्य उपक्रम आहे असे ग्रामगीता प्रचारक शिवदास गाडेकर महाराज यांनी गजानन महाराज विहीर पोपटखेड रोड अकोट येथे झालेल्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात 29 डिसेंबर 2024 रोजी प्रतिपादन केले.
यावेळी सर्वप्रथम संत जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले.जिल्ह्यात विनामुल्य दिनदर्शिकेचे प्रकाशनाच्या माध्यमातून नवीन समाज संघटन करण्यासाठी हा उपक्रम गत १० वर्षापासून सुरु आहे. आगामी काळात उत्कृष्ट शेतकऱ्यांना कृषी भूषण पुरस्कार सोहळा आयोजित करण्याचा मनोदय आहे असे संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष सुभाष दातकर यांनी प्रास्ताविकातून सांगितले. समाज बांधवांनी शेतीला पूरक व्यवसाय करा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त प्रभाकर मानकर यांनी केले. यावेळी जि.प. माजी सभापती शोभाताई शेळके, जि प सदस्य गजानन काकड, बाबासाहेब देशमुख, अकोट पंचायत समिती चे माजी सभापती कांतीराम गहले यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण कृषी भूषण श्रीकृष्ण ठोंबरे यांनी केले.यावेळी लावण्य दिलीप अतकर याचा सत्कार करण्यात आला स्वागत गीत राहुल शिरसागर संचालन प्रा. प्रवीण ढोणे यांनी तर आभारप्रदर्शन मंडळाचे सचिव प्रमोद सरोदे यांनी केले यावेळी ज्येष्ठ साहित्यिक देवानंद गहिले, डॉ अशोक मेतकर,डॉ. दिलीप अतकर, यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती यशस्वीतेकरीता अरुण वानखडे, बाळकृष्ण दिवाने, निळकंठ टोळे, अरुण पिंगळ, प्रमोद सरोदे, प्रशांत तह्राळे, शिवाजी काळे,संजय मेतकर,डिगांबर नाकट, अनंता फाटे, रविंद्र उन्हाळे, गजानन परकाळे, अनोख गहले, उमेश शेंगोकार प्रा, प्रवीण ढोणे,रामभाऊ शेंगोकार,प्रा, मयुर दातकर, बाळाभाऊ टिकार यांनी परिश्रम घेतले.
