स्थानिक हिवरखेड येथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या सेंट पॉल अकॅडमी मध्ये आपलl सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम करत असल्याच पाहायला मिळाले आहे. आज 25 डिसेंबरला सर्व जगभरामध्ये क्रिसमस साजरी करत असतानाच महाराष्ट्रातील सांताक्लॉज म्हणून ओळखल्या जाणारा वासुदेव आला हो वासुदेव आला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं पाश्चिमात्य संस्कृतीचे संपूर्ण जगभरामध्ये अनुकरण होत असताना सेंट पॉल अकॅडमी हिवरखेड येथे आपल्या संस्कृतीला जपणाऱ्या प्रत्येक उत्सवाला साजरा करण्याची परंपरा गेल्या दहा वर्षापासून शाळेने अविरत सुरू ठेवलेली आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया, प्रमोद चांडक, लुनकरण डागा, दीपक लखोटिया, शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी, उपमुख्याध्यापिका निमिता गांधी मॅडम उपस्थित होत्या. वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघर हिंडून पांडुरंगावरील अभंग – गवळणी गात दान मागणारा लोक कलाकार आहे डोक्यावर मोर पिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, पायांत विजार किंवा धोतर, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ कमरेला पांवा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी,गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा,हातात तांब्याचे कडे,कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असा वासुदेवाचा पेहराव असतो या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी नाटिकेच्या माध्यमातून वासुदेव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरून कशाप्रकारे लोकांना जागृत करण्याचं काम करत होतो हे दाखविण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमांमध्ये इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता कार्यक्रमाच्या यशस्वी ते करता विमल येऊल, गायत्री इंगोले,संजना दामदर मॅडम,सिसोदिया मैडम, खारोडे सर, संगीता मानके,पूजा खूमकर ,रविंद्र सर, अनुप सर, अजिंक्य सर, नितीन सर, अजय इंगळे सर, नागपुरे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
