हिवरखेड (प्रतिनिधी)
अकोला जिल्हातील शैक्षणिक क्षेत्रातील नामांकित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र सहदेवराव भोपळे कॉलेज तसेच सहदेवराव भोपळे विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी नुकत्याच पार पडलेल्या भारत सरकार व्दारा आयोजित सेन्ट्रल इंडस्ट्रीअल सेक्युरिटी फोर्स, सेन्ट्रल आर्म पोलीस फोर्स, सेन्ट्रल रिझर्व पोलीस फोर्स या विविध बौद्धिक, लेखी, शारीरिक विविध स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवून देश सेवेसाठी समर्पित होणाऱ्या माजी विद्यार्थी व त्यांच्या आई वडिलांच्या कौटुंबिक हृदय सत्काराचे आयोजन भोपळे विद्यालय व कौंतेय फिटनेस सेंटरच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेच अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, प्रमुख उपस्थितीत संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, जहाज वाहतूक मंत्रालयात सेवानिवृत्त झालेले संस्थेचे मार्गदर्शक धैर्यशिल भोपळे,प्रेस क्लबचे अध्यक्ष सतीश इंगळे, जिल्हा मध्यवर्ती बँक हिवरखेड विस्तार शाखेचे शाखाधिकारी अमित कुटेमाटे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, संचालक प्रा. कौस्तुभ भोपळे, नरेंद्र राऊत,आजी माजी सैनिक संघाचे अध्यक्ष फौजी दीपक कवळकार, सौ. अनिता राजेश भटकर, सौ.प्रमिला प्रकाश बकाल, सौ.दुर्गा अरुण आवठे व. सौ.अर्चना संतोष अस्वार व विजय अस्वार,प्राचार्य संतोषकुमार राऊत हे होते. यावेळी भोपळे कॉलेजचे माजी विद्यार्थी अश्विनी आवठे,आकाश भटकर, गणेश बकाल व कल्याणी कैलास अस्वार ह्या निवड पात्र विद्यार्थी – विद्यार्थिनीचा संस्थेच्या वतीने त्यांच्या पालकासमावेत सत्कार करण्यात आला. याप्रसंगी या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात भोपळे विद्यालयातील शाळास्तर ते यशस्वी ध्येय गाठण्याचा प्रवास व्यक्त केला. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी या विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत व चिकाटीने यश साकारले,याबद्दल त्यांची आपल्या अध्यक्षीय मनोगतातून प्रशंसा केली. तसेच संस्थेचे कार्यवाह श्यामशिल भोपळे यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आपल्या मनोगतातून कौतुक केले. या कार्यक्रमाचे सचालन डॉ. शंकर दुनघव तर आभारप्रदर्शन स्नेहल भोपळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.चेतन चुने, प्रा.स्नेहा शुक्ला,पद्मा टाले, सुनील वाकोडे, गणेश भोपळे, अक्षय मोरखडे, अमरदीप ढोकणे आदी शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.
