हिवरखेड
सावरा येवील राम गजानन
कबाडे हा मुलगा जन्मताच मतिमंद होता. हे रामच्या आईला १५ दिवसांनी समजले. त्यांनी डॉक्टरला विचारणा केली असता, त्यानी सांगितले की, हा मुलगा मतिमंद आहे. हा ज्याही काही क्रिया करील त्या खूप वेळानी करेल, खाणे, पिणे, चालणे, हसणं हे सर्व राम हा एक वर्ष नुसतं बेडवरच होता. मग त्याच्या आईने ठरवले की, हा जर असाच राहिला तर पुढे याचे कसे होणार, मग त्याला एक एक क्रिया करणे शिकवले, अस करत असताना खूप अडचणी येत होत्या. पण आईची माया ही कधीच कमी नसते. हे पावरून कळते राम हा एकुलता एक असून, रामच्या आईने त्याला मुलाप्रमाणे सामान्य सांभाळले. त्याला जे लागले ते दिले. त्याला घरातील सर्व कामे शिकवले. अस करत असताना एक एक वर्ष निघून गेले. राम आज २७ वर्षाचा झाला आहे. आज त्याला सर्व समजते. बाबासोबत कधी कधी शेतात पण जाते. सत्तावीस वर्ष संघर्ष करावा लागला आणि तो आज यशस्वी होताना दिसत आहे. राम आज २०० ते ३०० रूपये रोज कमावतो, त्याला घरीच द्रोण तयार करण्याची मशीन आणून दिली आणि द्रोण कसे तयार करायचे ते शिकवले. आज तो स्वतः दिवसभरात ५०० द्रोण बनवतो.सामान्य मुलंसुध्दा करू शकत नाहीत ते आज या मतिमंद रामने करून दाखवले, राम हा कोणतेही काम मन लावून करतो. आज हा दुसऱ्यावर अवलंबून न राहता स्वतःच्या इच्छा शक्तीवर आणि मेहनतीवर जीवन जगत आहे. याचे संपूर्ण श्रेय रामच्या आईचे आहे. आईत मुलं घडवण्याची इतकी देवी शक्ती असते हे यावरून दिसून येत आहे. रामसारखे भरपूर दिव्यांग, मतिमंद मुलं मुली आहेत. त्यांना पण शिकवा प्रेम लावा ते आवडीने ते नक्कीच शिकतात आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील हे यावरून समजते.
