लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारांचे मतदार यादीत नाव नसल्यामुळे मतदान होऊ शकले नाही. परंतु येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी व नवीन मतदाराची नोंदणी करून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी मनसुवर्ण प्रतिष्ठानच्या वतीने १ जुलै रोजी सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत माऊली झेरॉक्स, हिवरखेड येथे शिबिर होत आहे. शिबिरात मतदार नोंदणीसाठी नागरिकांनी जन्माचा दाखला / टी.सी ची झेरॉक्स,आधार व पॅन कार्ड झेरॉक्स,दोन कलर पासपोर्ट फोटो,लाईट बिलची झेरॉक्स,कुटुंबातील व्यक्तींचे मतदान कार्डची झेरॉक्स,विवाहीत असल्यास मॅरेज सर्टीफिकेट व लग्नाची पत्रीका आणून द्यावेत, असे आवाहन आयोजक मनसुवर्ण प्रतिष्ठाननी केले आह
