हिवरखेड प्रतिनिधी
माऊली मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी ने 100 कोटींचे व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल हीवरखेड शाखेत दीप महोत्सव व ग्राहक संतुस्टी कार्यक्रम साजरा करण्यात आला.
कार्यक्रमात माऊली मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडिट सोसायटी हीवरखेड चे शाखा सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमात स्थानिक शाखा अध्यक्ष डॉक्टर रामदास धुळे , उपाध्यक्ष शिवाजी नराजे, सदस्य आशिष नाठे, प्रवीण येऊल ,अनिल गावंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. हिवरखेड येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेशचंद्र गुप्ता , मंगेश गावंडे , पत्रकार रितेश टीलावत , धीरज बजाज यांनी शाखेला भेटी दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखेचे अधिकारी ओम प्रकाश चतुरकार , राजेश गावंडे , पूजा उगले , कृष्णा शीत्रे, ज्ञानेश्वर गुजर , हरिओम मिसाळ यांनी परिश्रम घेतले.
