अकोला (प्रतिनिधी ) दि १ डीसें . महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी व दिव्यांग कर्मचारी* संघटना अकोला च्या वतीने दरवर्षी प्रमाणे ३ डीसेंबर २०२४ ला संघटनेचे कार्यालय* *हेडपोष्ट ऑफिस जवळ अकोला येथे भव्य जागतीक अपंग दिनाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये २ डिसेंबर २०२४ ला अपंग भागीदारी कायदा १९९५ व दिव्यांग हक्क अधिनियम २०१६बाबत सकाळ सत्रात मार्गदर्शन कार्यशाळा तर दुपार सत्रात दिव्यांग कवि संमेलनाचे आयोजन केले आहे
दिनांक ३डीसेंबर २४ला सकाळी ११ वाजता दिव्यांगांची भव्य रॅली दुपारी १२ वाजता गुणवंत दिव्यांग विद्यार्थी , खेळाडू, कर्मचारी पाल्य यांचा गुणगौरव तर दु १ वाजता उपस्थित
सन्माननिय पदाधिकारी व अधिकारी यांचे मार्गदर्शन होणार असून दुपारी २ वाजता भोजनानंतर दु ३ वाजता दिव्यांग वधूवर परिचय मेळावा तर सायंकाळी ५वाजता कार्यक्रमाची सांगता होणार आहे
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संजय बरडे यांचे अध्यक्षते खाली होणाऱ्या या जागतिक अपंग दिन कार्यक्रमांत अकोला जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी मा अजीत कुंभार (भाप्रसे ) तसेच जिल्हा परिषदे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा . बी वैष्णवी (भाप्रसे ) तसेच मा बच्चन सिंह ( भापोसे ) जिल्हा पोलीस अधीक्षक अकोला मा योगेश पैठणकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधीकरण अकोला यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये तर मा डॉ . सुनिल लहाणे आयुक्त मनपा अकोला , मा मिनाक्षी गजभिये (अधिष्ठाता ) शा वै म अकोला , मा विनय ठमके अति मुकाअ जि प अकोला , मा हरिनारायसिंह परिहार समाज कल्याण अधिकारी , व डॉ शरद जावळे उपविभागीय अधिकारी अकोला यांचे उपस्थिती मध्ये होणार असून सदर कार्यक्रमांस जिल्ह्या तील दिव्यांग बांधवांनी मोठ्यां संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे संजय बरडे राज्य उपाध्यक्ष , मो अ अजिज जिल्हा सचिव व दिलीप सरदार जिल्हा कोषाध्यक्ष अकोला यांनी केले आहे
